पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेस आणि डाव्यांसह 21 पक्षांची भारत बंदची हाक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज 'भारत बंद' पुकारला आहे. मनसेससह राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. तर, देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं सर्वपक्षांनी आवाहन केलं आहे. सोनिया गांधी आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते सकाळी राजघाटावर धरणं देणार आहेत. 

मात्र, या भारत बंद दरम्यान शाळा, महाविद्यालयं सहभागी होणार नाहीत. तसंच स्कूल बसही सुरू राहणार आहेत.
 
WebTitle : marathi news petrol diesel price hike bharat bandh by indian national congress

संबंधित बातम्या

Saam TV Live