पेट्रोल 0.16 पैसे तर डिझेल 0.20 पैशांनी महागलं; सलग दहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

रुपयाची घसरगुंडी आणि कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाचा भडका उडाला आहे. रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य लोकांचे मोठे हाल सुरु आहेत.

सलग दहाव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झालीये. त्यामुळे 9 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ सलग दहाव्या दिवशीही कयाम आहे. आज पेट्रोल 0.16 पैसे तर डिझेल 0.20 पैशांनी महागलंय. 16 ऑगस्टनंतर पेट्रोलच्या किंमतीत 2 रूपयांनी वाढ झाली आहे तर, डिझेलच्या किंमतीत 2.42 रूपयांनी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महागाईत भर पडण्याची चिन्ह आहेत. 

रुपयाची घसरगुंडी आणि कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाचा भडका उडाला आहे. रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य लोकांचे मोठे हाल सुरु आहेत.

WebTitle : marathi news petrol diesel price hike continues on tenth day  

संबंधित बातम्या

Saam TV Live