देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज देशभरात उच्चांक गाठलाय. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचलंय. नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलाय. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारनं नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झालीय.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज देशभरात उच्चांक गाठलाय. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर 81 रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर 68 रुपयांवर पोहोचलंय. नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलाय. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारनं नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 रुपये तर डिझेलच्या दरात 7 रुपयांनी वाढ झालीय. यामुळे विविध करांनी सत्त असलेल्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live