सलग आठव्या दिवशी इंधन दरवाढीचा भडका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 सप्टेंबर 2018

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असून याचा फटका भारताला बसत आहे. आज मुंबईत पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 36 पैशांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोलने उच्चांक गाठत, 85 रुपये 25 पैशांवर उडी घेतली असून डिझेलचे दरही 75 रुपयांवर पोहोचले आहे.

मुंबईत डिझेल प्रतिलिटर 75 रुपये 12 पैसे दराने विकले जात आहे. सलग आठव्या दिवशी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली आहे.

कोलकाता, दिल्ली, चेन्नई या महानगरांमधील इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे. तेल भडक्याने महागाई आणखी भडकण्याची शक्यता आहे...
 
संबंधित बातम्या

Saam TV Live