पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सरकारच्या तिजोरीत पडतेय कोट्यवधी रुपयांची भर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता बेहाल असताना राज्य सरकार मात्र मालामाल झाल्याचं चित्र आहे. राज्य सरकार पेट्रोलवर प्रतिलिटर 23 रुपये व्हॅटच्या रुपये कमावत आहे. दररोजची पेट्रोलवरची व्हॅटवसुली कोट्यवधी रुपयांच्या घरात जातेय. 

इंधनाची किंमत एक रूपयानं वाढल्यानंतर राज्य सरकारला 17 कोटी रुपये मिळतात. ऑगस्ट महिन्यात 3 रुपये दरवाढ झाली. त्यामुळं ऑगस्ट महिन्यात सरकारची 1 हजार 896 कोटींची कमाई झाली. 

सामान्य जनता सरकारच्या नावानं बोटं मोडत असताना राज्य सरकारची कमाई दरवर्षी कोट्यवधी रुपयांनी वाढतेय.  2016-17मध्ये राज्य सरकारला 18 हजार 977 कोटींचा व्हॅट वसूल केला. तर 2017-18मध्ये 22 हजार 652 कोटींचा कर गोळा झाला. 2018-19मध्ये 4 महिन्यांत आतापर्यंत 9 हजार 40 कोटींची कमाई झालीय.

सर्वसामान्य महागाईच्या वणव्यात होरपळतोय. अशा स्थितीत सामान्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य सरकार नफा गोळा करण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळं जनतेत संतापाची भावना निर्माण झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live