पेट्रोल 28 तर डिझेल 19 पैशांनी महागलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

तब्बल तीन आठवड्यांपासून देशात इंधन दरवाढ सुरूच आहे. पेट्रोलचे दर 89.29 रुपये,28 पैशांची वाढ झाली असून डिझेलचे दर 78.26 रुपये, 19 पैशांची वाढ झालीय. जवळजवळ रोजच इंधनाचे दर वाढतायत त्यामुळे इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यास सरकार सपशेल अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतंय.

ज्या इंधन दरवाढीच्या मुद्यावरून विरोधात असताना भाजपची नेते मंडळी तत्कालीन यूपीए सरकारवर खापर फोडत होती. तेच भाजपचे नेते या इंधन दरावाढी साठी आंतरराष्ट्रीय बाजार आणि तेलाच्या किंमती कडे बोट दाखवतायत. आपल्या हातात हे दर नियंत्रणात ठेवणं नाही असंही भाजप नेत्यांनी सांगून टाकलंय.

मात्र, या प्रकारामुळे सर्वसामान्यांचं जगणं दिवसेंदिवस मुश्किल होऊ लागलंय. सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत असून लोकांचं बजेटंच कोलमडलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live