सलग सतराव्या दिवशी इंधन दरवाढ.. इंधन दरवाढीने भाज्याही कडाडल्या! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सलग सतराव्या दिवशी इंधन दरवाढ सुरूच आहे. पेट्रोल 14 तर डिझेल 15 पैशांना महागलंय. मुंबईत पेट्रोल 88.26 तर डिझेल 77.47 रु. लिटर झालं असून कालच्या बंदनंतरही इंधन दरवाढ कायम आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात वाढ होत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. इंधनदरात जी वाढ होत आहे त्यात केंद्र सरकारचा कोणताही हात नाही. इंधनाचे दर कमी करणे केंद्र सरकारच्या हातात नाही, असे स्पष्टीकरण काल केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका पत्रकार परिषदेत दिले होते.

भाज्यांच्या किंमतीमध्ये बाजारपेठेत भरमसाठ वाढ
इंधन दरवाढ आणि भाज्यांची घटलेली आवक यामुळे भाज्यांच्या किंमतीमध्ये बाजारपेठेत भरमसाठ वाढ झालीय. कालच्या तुलनेत अचानक भाज्यांच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागलीय. गणेशोत्सव सणाच्या तोंडावर भाज्यांची झालेली दरवाढ ही व्यापारी आणि ग्राहकांसाठी ही मोठी समस्या ठरत आहे.

WebTitle : marathi news petrol diesel prize hike rise in vegetable prices 

संबंधित बातम्या

Saam TV Live