खूशखबर! पेट्रोल स्वस्त झालं... वाचा काय आहेत नवीन दर

खूशखबर! पेट्रोल स्वस्त झालं... वाचा काय आहेत नवीन दर

नवी दिल्ली : सर्वांसाठी एक मोठी खूशखबर आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेत. सौदी अरेबिया व रशियामधील कच्च्या तेलाच्या वादामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये लक्षणीय घसरण झालीय. दिल्लीत एका लिटरवर २.६९ रूपये तर डिझेलच्या किंमतीवर २.३३ रूपयांची घसरण झाली आहे. जवळपास तीन रूपयांची घसरण झाल्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत ७०.२९ रूपये व डिझेलची किंमत ६३.०१ रूपये प्रति लिटर आहे. 


तेल उत्पादनावरून सौदी अरेबिया व रशियामध्ये मोठा वाद सुरू आहे. रशियाला अडचणीत आणण्यासठी सौदीने तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र रशिया सौदीला तेल उत्पादन करण्यास अडकाठी करत असल्याने या दोन देशांमध्ये किंमतीवरून वाद सुरू आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० टक्क्याने घसरण झाली आहे. भारताला याचा फायदा होऊ शकतो व पेट्रोलचे दर ५० रूपयांपर्यंत येऊ शकतात. मात्र सध्या दिल्लीत पेट्रोल २.६९ रूपयांनी स्वस्त झाले आहे. 

दरम्यान, सध्या मुंबईत पेट्रोलचा दर ७५.९९ रुपये प्रति लिटर व डिझेल ६५.९७ रुपये प्रति लिटरने असा आहे. तर, कोलकाता व चेन्नई येथे पेट्रोल अनुक्रमे ७२.९८ व ७३.०२ रुपये लिटर तर डिझेल ६५.३५ व ६६.४८ रुपये प्रति लिटर विक्री केले जात आहे. त्यानुसार लवकरच इंधनाचे दर कमी करण्यात येतील अशी चिन्हं दिसतायत. त्यामुळे सर्वसामान्यांना तुर्तास थोडा तरी दिलासा मिळणार एवढं नक्की. 

Web Title - marathi news Petrol Diesel rates decreases by 2 rs 69 paise in Delhi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com