पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून मुंबईत बैलगाडी आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

मुंबई -  पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होतेय. अशातच या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत बैलगाडी आंदोलन करण्यात आलं. यावेळी अणूशक्ती नगर इथे रास्तारोको करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप सरकारचा निषेधही करण्यात आला.

दरम्यान,  तेल कंपन्यांनी देशातल्या जनतेची क्रूर चेष्टा केलीय. सकाळी इंधन 59 पैशांनी स्वस्त झाल्याचं समोर आलं होतं मात्र थोड्याच वेळाता या अल्पशा आनंदावर तेल कंपन्यांनी विरझण घातलं. कारण इंधन 59 नाही तर अवघ्या 1 पैशानं  स्वस्त केल्याचं जाहीर करण्यात आलं. टायपिंगमध्ये चूक झाल्याचं तेल कंपन्यांकडून सांगण्यात आलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live