आज पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 47 पैशांनी पुन्हा वाढले; पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग चौदाव्या दिवशीही कायम

आज पेट्रोल 38 पैसे तर डिझेल 47 पैशांनी पुन्हा वाढले; पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग चौदाव्या दिवशीही कायम

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका सलग चौदाव्या दिवशीही कायम आहे. आज पेट्रोलचा दर 38 पैसे तर डिझेलचा दर 47 पैशांनी पुन्हा वाढले. मुंबईत पेट्रोल 87 रुपये 77 पैसे, तर डिझेल 76 रुपये 98 पैशांवर पोहोचलंय.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिणामही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं पाहायला मिळतंय. एकिकडे इंधन दराची झेप घेणं सुरु असताना, पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत द्यायला सरकारनं स्पष्ट नकार दिलाय.

Web Title: marathi news petrol price hike continues on day fourteen 

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com