गेल्या चार वर्षात पेट्रोलची किती दरवाढ झाली माहितीये ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

मुंबई - राज्यात पेट्रोलवर आकारल्या जाणाऱ्या अधिभारात गेल्या चार वर्षांत नऊपटीने वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत पेट्रोलवर प्रतिलिटर "व्हॅट' अधिक एक रुपया असा आकारला जाणारा अधिभार आजच्या घडीला नऊ रुपयांवर पोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या चार वर्षांत पेट्रोलवरील अधिभारात नऊपट वाढ केल्याचे स्पष्ट होते. विक्रीकर अधिक अधिभार या सूत्रामुळे महाराष्ट्रात पेट्रोल सर्वाधिक महाग आहे.

अर्थ विभागाकडून पेट्रोल, डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या कराची माहिती घेतली असता अवघ्या चार वर्षांत पेट्रोलवरील अधिभार एक रुपयावरून नऊ रुपये इतका करण्यात आल्याचे दिसून आले. कॉंग्रेस आघाडी सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित विक्रीकरात (व्हॅट) केलेली कपात मात्र कायम राहिली आहे. कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना 2005-06 या वर्षात "व्हॅट' लागू करण्यात आला. त्या वेळी पेट्रोल आणि डिझेलवर कर आकारणी करताना दोन भाग करण्यात आले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, नांदेड, नंदूरबार आणि नागपूर या अधिसूचित शहरांसाठी इंधनावर वेगळा कर तर महाराष्ट्रातील उर्वरित शहरांसाठी वेगळा कर आकारण्यास सुरवात झाली. एक एप्रिल 2005 पासून अधिसूचित शहरांत पेट्रोलवर 30 टक्के "व्हॅट' अधिक एक रुपया अधिभार अशी कर आकारणी होत होती. 2008 मध्ये कॉंग्रेस सरकारने "व्हॅट'मध्ये चार टक्के कपात करून तो 26 टक्के इतका केला. कॉंग्रेसचे सरकार असताना पेट्रोलवर "व्हॅट' व्यतिरिक्त प्रतिलिटर एक रुपया कर आकारला जात होता.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक ऑक्‍टोबर 2015 मध्ये पेट्रोलच्या अधिभारात प्रतिलिटर एक रुपयावरून थेट तीन रुपये अशी वाढ करण्यात आली.

WebTitle : marathi news petrol price hike in last four years  

संबंधित बातम्या

Saam TV Live