घोषणा 5 रुपयांची, प्रत्यक्षात पेट्रोल 4 रुपयेच स्वस्त...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

जुलैपासून सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरात अखेर केंद्राकडून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोल 5 तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणाही सरकारकडून करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ही स्वस्ताईही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारीच ठरली आहे.

पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार असल्याचं जाहीर केलं तरी ग्राहकांना मात्र याचा प्रत्यक्ष फायदा चार ते साडे चार रुपयांनीच झाला आहे. लिटरमागे पूर्ण पाच रुपये कमी झालेले नाहीत. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी दीड रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनीही एक रुपयांचा दिलासा दिला.

याप्रमाणे राज्यात पेट्रोलसाठी किमान पाच रुपये दिलासा मिळणं अपेक्षित आहे, पण पूर्ण पाच रुपयांचा फायदा ग्राहकांना मिळालेला नाही.

WebTitle  : marathi news petrol price relief not up to the mark 

संबंधित बातम्या

Saam TV Live