पेट्रोल 22 तर डिझेलच्या दरात 19 पैशांची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

आज पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली.. पेट्रोल प्रतिलिटर 22 पैसे आणि डिझेल 19 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलसाठी मुंबईकरांना आज 79.01 रुपये मोजावे लागतील. 

राज्यासह देशभरात दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानं माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे.

चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर 6 जुलै ते 26 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live