पेट्रोल गेल्या सहा दिवसांत तब्बल 46 पैशांनी स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 जून 2018

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सोळा दिवस वाढ केल्यानंतर आता गेल्या सहा दिवसांपासून इंधनाचे दरात कपात करण्यात येत आहे. काही रुपयांमध्ये वाढ झालेल्या पेट्रोलचे दर आता गेल्या सहा दिवसांत तब्बल 46 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सोळा दिवस वाढ केल्यानंतर आता गेल्या सहा दिवसांपासून इंधनाचे दरात कपात करण्यात येत आहे. काही रुपयांमध्ये वाढ झालेल्या पेट्रोलचे दर आता गेल्या सहा दिवसांत तब्बल 46 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

गेल्या सहा दिवसांत पेट्रोलच्या दरात 46 पैशांनी कपात करण्यात आली आहे, तर डिझेलच्या किंमती 34 पैशांनी कमी झाल्या आहेत. आज (सोमवार) दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14-15 पैसे प्रति लिटरने घट झाली आहे. सलग सहाव्या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात झाली तर सहामधील पाच दिवसांमध्ये डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार, सहा दिवसात पेट्रोलचे दर दिल्लीत प्रतिलिटर 47 पैसे, मुंबईत प्रतिलिटर 46 पैसे, कोलकातामध्ये 46 पैसे तर चेन्नईत 49 पैशांनी कमी झाले आहे. डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये 34 पैसे प्रतिलिटर आणि मुंबई आणि चेन्नईमध्ये 36 पैसे प्रति लीटर घट झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींविषयी जाणून घेण्यासारख्या पाच गोष्टी:
1) इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अनुमानानुसार, सोमवारी (4 जून) सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 77.96 रुपये प्रतिलीटर, कोलकातामध्ये 80.6 रुपये प्रतिलीटर, मुंबईमध्ये 85.77 रुपये प्रतिलिटर, तर चेन्नईत 80.94 रुपये प्रतिलिटर होते. त्याचबरोबर डिझेलच्या किंमती अनुक्रमे 68.97रु. प्रति लीटर, 71.52 रु. प्रति लीटर, रु. 73.43 रु. प्रति लीटर आणि रु. 72.82 प्रति लिटर होत्या.

2) आठवड्यापेक्षा जास्त कालावधीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत कमी होऊन 78 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलची किंमत रु. 69 झाली. वेगवेगळ्या राज्यात तेथील स्थानिक विक्री कर किंवा व्हॅटनुसार किंमती बदलतात. सर्व महानगरांच्या तुलनेत दिल्लीमध्ये इंधनाचे दर स्वस्त आहेत.

३) सध्या भारतात पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रितमुक्त आहेत. जागतिक क्रूड ऑइल आणि रुपया-डॉलरच्या फॉरेक्स दराचा आधार घेऊन इंधन केंद्रांवर दररोज सकाळी 6 वाजल्यापासून इंधन दरांमध्ये बदल करुन ते निश्चित केले जातात.

4) 2014 मध्ये कच्च्या तेलामुळे गेल्या महिन्यात 80 डॉलर प्रति बॅरलच्या तुलनेत जे नुकसान झाले होते ते भरुन निघाले आहे. अमेरिकी डॉलरकडून रुपीने (रु.)काही वसूली केली आहे. रुपीने गेल्या महिन्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 18 महिन्यांचा नीचांक गाठला होता. 

5) भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक इंधन आयात करतो. यामुळे देशाच्या आयात बिलामध्ये कच्चा तेलाचा वाटा सर्वाधिक असतो. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत वाढ झाली आहे. यावर्षी आतापर्यंतच्या आकडेवारीत ग्रीनबॅक (डॉलर बिल)च्या बरोबरीत रुपया 5 टक्क्यांच्या खाली आला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live