पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणणं शक्य; मात्र, त्यावर राज्यांना व्हॅट लावण्याचीही मुभा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणणं शक्य असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या वर्षात त्याच्या चौकटीत आवश्यक फेरबदल करण्यात येत आहेत. दुसऱ्या वर्षात जीएसटी बाहेर असलेल्या पेट्रोल-डिझेलसारख्या वस्तूंना जीएसटीत आणण्याची अपेक्षा आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

मात्र त्यावर राज्यांना व्हॅट लावण्याचीही मुभा मिळू शकेल. यासंबंधीचा निर्णय जीएसटी परिषद घेण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. जगात कोणत्याही देशात पेट्रोल-डिझेल पूर्णत: जीएसटीत नाही.

जीएसटी आणि व्हॅट असा संयुक्त कर इंधनांवर लावण्याचा प्रघात आहे. तीच व्यवस्था भारतातही राबविली जाईल, असंही सांगितलं जातंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live