ऐन दिवाळीत पेट्रोल शंभरी पार करणार ? आंतरराष्ट्रीय बाजारातून महागाईचा भडका उडण्याचे संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नव्वद रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल कदाचित ऐन दिवाळीतच शंभरी पार करू शकतं,  असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. सध्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या आसपास आहे. या वर्षाअखेरीपर्यंत हा दर शंभर डॉलर्स पार करू शकतो असा अंदाज सिंगापूरमध्ये एशिया पॅसिफिक पेट्रोलियम कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आलाय. 

भारतातल्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन तेलाच्या दरांवर अवलंबून असतात. इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव कडाडण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे भाव 90 डॉलर्स प्रति बॅरल होऊ शकतात, आणि नवीन वर्षाच्या आगमनावेळी हा भाव शंभरी पार करू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

जगाची कच्च्या तेलाची मागणी इतिहासात प्रथमच 10 कोटी बॅरल प्रतिदिन या विक्रमी आकड्याच्या जवळ जात आहे. परिणामी भारतामध्येही 90 रुपये प्रति लिटरच्या घरात असलेल्या पेट्रोलच्या दरानं ऐन दिवाळीत शंभरी पार केली तर आश्चर्य वाटायला नको.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live