पीएफ काढणं आता आणखी कठीण; पीएफ काढण्याच्या नियमांत बदल

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

प्रॉव्हिडंट फंडमधून रक्कम काढणं आता कठीण झालंय. वास्तविक पीएफ काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर ती सुलभ झाली होती. मात्र, आता पुन्हा त्यात काही बदल केल्यामुळे ही प्रक्रिया प्रचंड किचकट झालीय. 

काय आहे ही प्रक्रिया : 

प्रॉव्हिडंट फंडमधून रक्कम काढणं आता कठीण झालंय. वास्तविक पीएफ काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन केल्यानंतर ती सुलभ झाली होती. मात्र, आता पुन्हा त्यात काही बदल केल्यामुळे ही प्रक्रिया प्रचंड किचकट झालीय. 

काय आहे ही प्रक्रिया : 

  • पीएफ काढण्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface या वेबसाइटवर जावं लागेल. 
  • त्यानंतर आपला युनिव्हर्सल अकाउंड नंबर अर्थात यूएएन आणि पासवर्डच्या मदतीनं लॉगइन करावं लागेल.
  • लॉगइन झाल्यानंतर होमपेजवरच्या ऑनलाइन सर्व्हिस भागात जावं लागेल.
  • इथं आपल्या रजिस्टर्ड बँक अकाउंटच्या शेवटच्या 4 आकड्यांच्या मदतीनं अकाउंट व्हेरिफाय करावं लागेल.
  • त्यानंतर ऑनलाइन क्लेमसाठी क्लिक करावं लागेल.
  • या क्लेम ऑप्शनमध्ये आपल्याला किती रक्कम काढायची आहे, यासह पत्ता आणि पासबुक किंवा चेकबुकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
  • ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली की रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. हा व्हेरिफाय केल्यानंतर पीएफच्या रकमेचा आपला दावा सक्रिय होईल. 
  • त्यानंतर क्लेम स्टेटसमध्ये जाऊन आपला क्लेम तपासून पाहू शकतो..

ही प्रक्रिया किती किचकट आहे हे लक्षात आलं ना. त्यामुळे तुम्हाला जर पीएफमधली रक्कम काढायची असेल तर थोड्या मनस्तापाची तयारी ठेवायलाच हवी.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live