140 नंबरवरुन येणारा कॉल उचलू नका- पोलिसांची माहिती, वाचा काय आहे त्या नंबरचं सत्य?

साम टीव्ही
शनिवार, 11 जुलै 2020
  • मोबाईल वापणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी
  • 140 नंबरवरुन येणारा कॉल उचलू नका- पोलिस
  • 140 नंबरवरुन येणारा कॉल उचलू नका- पोलिस
  • 140 वरुन येणारा फोन बँकेतील पैसे लुटू शकतो

आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. प्रत्येक जण सध्या मोबाईल फोन वापरतो. दिवसातून अनेकदा तुम्हाला 140 या नंबरवरुन फोन आलेला असू शकतो. या नंबरबाबत एक मेसेज प्रचंड वायरल झालाय. या मेसेजमध्ये 140नंबरवरुन येणारे फोन उचलून नका, असं आवाहन करण्यात आलंय. सोबतच पोलिसांचाही एक व्हिडीओ शेअर केला जातोय. या व्हीडीओवर महाराष्ट्र सायबर सेलने एक महत्त्वाचं आवाहन केलंय.  

140 या नंबरवरुन येणारे कॉल हे टेलिमार्केटींगचे कॉल्स असतात, असं सायबर सेलकडून सांगण्यात आलं आहे. वायरल मेसेजमध्ये या नंबरवरुन फोन आल्यास तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणारं बँक खातं रिकामं होऊ शकतं, असा इशारा देण्यात आलाय. यावरुन लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तसंच पोलिस याप्रकारचं आवाहन करताचा एक व्हिडीओही वायरल झाल्यानं नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्न लोकं उपस्थित करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या व्हिडीओने टेलीमार्केटींग कॉल्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी तातडीने केले. १४० आकड्यावरुन सुरू होणाऱ्या क्रमांकावरचे आलेले फोन उचलल्यास बॅंकतील सर्व रक्कम काढली जाईल, असे या घोषणेत सांगितले जात आहे.

काय आहे सत्य?

एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रीकरण आहे. मात्र तसा कोणताच खुलासा यामध्ये नसल्याने खरेखुरे पोलीसच या सूचना करीत असल्याचे नागरिकांना वाटले आणि चांगलाच  गोंधळ उडाला. हा व्हिडीओ पाठवल्यानंतर पोलिसांनी ही अफवा असल्याची माहिती दिली. तरीही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली.  त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.


संबंधित बातम्या

Saam TV Live