कोरोनासंकटात कबुतरांनी वाढवला धोका? कबुतरांमुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला

साम टीव्ही
रविवार, 12 जुलै 2020
  • कोरोनासंकटात कबुतरांनी वाढवला धोका?
  • कबुतरांमुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला
  • कबुतरांची विष्ठा ठरू शकते जीवघेणी 

कोरोनाच्या संक्रमणामुळे आधीच देशातली जनता हैराण आहे. त्यात आता कबुरतरांमुळे कोरोनाचं संकट गडद होण्याची भीती व्यक्त होतीय. कबुतरांमुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढलाय. अशा रूग्णांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या जीविताला अधिक धोका असल्याची बातमी समोर येतीय. एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं वाढतोय. त्यातच आता कबुतरांमुळे कोरोनाचं संकट आणखी गडद होण्याची भीती वाढलीय.. कबुतरांमुळे श्वसनाच्या आजारांचा धोका वाढलाय. 

सध्या कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतोय. त्यामुळे रूग्णांना खोकला, सर्दी आणि श्वास घेण्यास अडचण होतीय. हे कमी म्हणून की काय आता कबुतरांमुळे कोरनासंकट आणखी गडद होण्याची भीती वाटू लागलीय. कबुतरांच्या विष्ठेमुळे असंख्य जंतू हवेत पसरतात. त्यामुळे फुफ्फुसाचे रोग, अस्थमा अशा प्रकारचे रोग होण्याची शक्‍यता असते. एखाद्या व्यक्तीला यामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसाचा रोग झाल्यास त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. पुण्यात कबुतरांची संख्या जास्त असल्यानं धोका वाढलाय. 

कबुतरांच्या विष्ठेमधील बुरशीमुळे मानवी शरीरात ‘हिस्टोप्लाज्मोसिस, ‘सिटॅकोसीस’ आणि ‘क्रिप्टोकोकोसिस’ सारख्या श्वासनाशी संबंधित रोगाचे संसर्ग होतात. त्यामुळे ताप, खोकला, छातीत दुखणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे अशा प्रकारची लक्षणं आढळतात. यातील काहींची लक्षणं 7 ते 14 दिवसांमध्ये तर काहींची एक ते तीन आठवड्यानंतर आढळतात. 

कोरोना संसर्ग आणि कबुतरांमुळे  होणारे आजार दोन्ही फुफ्फुसांच्या एकाच भागावर परिणाम करतात. अशातच एखाद्या व्यक्तीला दोन्ही आजार झाले तर रुग्ण अधिक गंभीर होऊ शकतो. तसंच प्रत्येकी 10 मधील 6 ते 7 रुग्णांना श्वसनाचे आजार त्यांच्या सोसायटी किंवा घराजवळील कबुतरांमुळे होतो. त्यामुळे याबाबत जागृक राहणं अत्यंत आवश्यक आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live