10 वी पास गॅरेजचालकाची गगनभरारी ; भारतीय जवानांसाठी बनवलं हेलिकॉप्टर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

असं म्हणतात की तुमच्या शिकण्याची,काही तरी करून दाखवण्याची जिद्द, चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हेच सिद्ध करून दाखवलंय. पिंपरी-चिंचवडमधल्या प्रदीप मोहिते यानं...प्रदीपनं आपल्या अनुभवाच्या बळावर चक्क हेलिकॉप्टरच तयार केलंय. जेमतेम 10 वी पास असलेला गॅरेज व्यवसायात आहे. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच त्यानं या हेलिकॉप्टरची निर्मीती केली. संपुर्ण स्वदेशी बनावटीचं हे हेलिकॉप्टर 300 फुटांपर्यंत उडू शकतं. 

हे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी प्रदीपला त्यांच्या मेहुण्याची साथही लाभलीय. त्यांनी हा आपला अनोखा आविष्कार भारतीय जवानांना समर्पित केलाय. 
सध्या देशात हेलिकॉप्टर घोटाळयाचं वादळ सुरू आहे. पण पिंपरी-चिंचवडमधल्या अवलियानं स्वदेशी बनावटीचं हेलिकॉप्टर बनवून घोटाळेबाजांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय आणि विकासाची आशा पल्लवित केलीय असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live