पुण्यात वॉर्डबॉयकडून मतिमंद मुलीचा विनयभंग

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 23 मार्च 2019

पिंपरी (पुणे) - उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केलेल्या २८ वर्षीय मतिमंद मुलीचा वॉर्डबॉयने विनयभंग केला. ही घटना चिंचवड येथील आस्था हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडली.

प्रवीण मगन जाधव (वय २६, रा.जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वॉर्डबॉयचे नाव आहे. याबाबत ६४ वर्षीय मुलीच्या पित्याने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास आरोपी जाधव हा मतिमंद मुलगी अॅडमिट असलेल्या रुममध्ये घुसला. तिथे त्याने मतिमंद मुलीचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक कांबळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: a girl molested by ward boy in pimpri

संबंधित बातम्या

Saam TV Live