पिंपरी पोलिसांनी आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

घरफोडी करुन पळ काढणाऱ्या टोळीचा डाव धाडसी पिंपरी पोलिसांनी धुळीस मिळवलं आहे. तलवार आणि कोयते घेऊन एका सोसायटीत दरोडा टाकणाऱ्या या दरोडेखोरांसोबत पोलिसांच्या झटापटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारस तीन दरोडेखोर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच. त्यांनी तात्काळ हालचाल करत दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी दोन महिला पोलिस रणरागिणीसुद्धा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज होत्या.

( VIDEO )

हत्यारबंद दरोडेखोर जेव्हा घरफोडी करुन बिल्डिंगखाली उतरत असतानाच, कर्दनकाळ बनून आलेल्या पोलिसांना पाहून त्यांची दातखिळच बसली. हत्यारबंद दरोडेखोरांपुढे, धाडसी पोलिस इंचभरही मागे हटले नाहीत आणि अखेरीस पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एका दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या

Saam TV Live