निवडणुकीत दीड लाख मतांनी निवडून येणार : श्रीरंग बारणे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मे 2019

पिंपरी : आपण या निवडणुकीत दीड लाख मतांनी निवडून येणार असल्याचा ठाम आत्मविश्वास मावळमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे यांनी व्यक्त केला आहे. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला ते 'सरकारनामा'शी बोलत होते. आपण पवारांचा नाही,तर पवार घराण्याचा पराभव करणार असल्याची दर्पोक्तीही त्यांनी केली. 

घाटावरच नाही, तर घाटाखालीही आपल्याला चांगले मतदान व मताधिक्य मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. मतमोजणीला एक दिवस बाकी राहिल्याने टेन्शन आले आहे का अशी विचारणा केली असता टेन्शन घेणारा नाही, तर देणारा माणूस आहे, असे बाऱणे  म्हणाले. पवारांचा नाही,तर पवार घराण्याचा निश्चीत पराभव करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे चिंचवडचे आमदार यांनी लाखभर मतांचे लीड देणार असल्याचे सांगितले आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, घाटावरच नाही,तर घाटाखालूनही आपल्याला मताधिक्य मिळणार आहे. दीड लाखापेक्षाही जास्त लीडने निवडून येणार आहे. विजय मिळावा म्हणून कुलदैवत वा कुठल्याही देवाला नवस केलेला नाही.कुठेही गेलेलो नाही. शहरातच आहे. 

बारणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पूत्र पार्थ असल्याने ही लढत लक्षवेधी झाली आहे. राज्याचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. आपल्या विजयाविषयी बारणे हे ठाम दिसले. ते विजयी झाले,तर ती त्यांची खासदारकीची दुसरी टर्म असेल. तर, शिवसेनेची ती हॅटट्रिक ठरेल. दरम्यान, पार्थ यांनी, मात्र २३ मे नंतर म्हणजे मतमोजणी झाल्यानंतरच बोलणार असल्याचे सांगितले.

Web Title : The elections will be won by one and a half lakh votes Shrirang Barne

संबंधित बातम्या

Saam TV Live