दाभोलकरांवर गोळ्या झाडलेले पिस्तुल सापडले अरबी समुद्राच्या तळाशी

दाभोलकरांवर गोळ्या झाडलेले पिस्तुल सापडले अरबी समुद्राच्या तळाशी

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेल्या पिस्तुल शोधण्यात सीबीआयला यश आले आहे. नार्वेतील जलतरणपटुंनी अरबी समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधून काढले आहे.  
 

सीबीआयद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तूलाचे अवशेष शोधण्याची मोहीम अरबी समुद्राच्या खाडीत सुरु होती. डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांनी ठाण्यातील खाडीत पिस्तुलाचे सुटे भाग टाकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शस्त्राचे अवशेष शोधण्यासाठी परदेशातून पाणबुड्यांना बोलावण्यात आले होते, तरी त्यास यश येत नव्हते. सीबीआयच्या मागणीवरून न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने या मोहिमेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिली होती. सीबीआयच्या प्रयत्नांना आता यश आले असून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळाशी सापडले आहे. त्यामुळे दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या तपासात मदत होणार आहे.

डॉ. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये झाली. पानसरे आणि दाभोलकर यांच्या निकटवर्तीयांनी न्यायालयात याचिका केल्या आहेत.
 

Web Title: marathi news A pistol fired at Dabholkar was found at the bottom of the Arabian Sea

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com