जगातील सर्वात जास्त वेळ हवेत असणारे 'हे' विमान तुम्हाला माहित आहे का ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सिडनी : जगातील सर्वात जास्त वेळ हवेत असणारे विमान सुमारे 20 तासानंतर ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे उतरले.  या विमानाने तब्बल 10 हजार मैलाचा प्रवास केला आहे.  या विमानात केवळ 50 प्रवासी असून हे आतापर्यंत इतिहासातील सर्वाधिक वेळ आकाशात असणारे विमान आहे. 

जगातील सर्वाधिक वेळ आकाशात चालविण्यात आलेल्या या विमानाने प्रवासी आणि विमानातील कर्मचा-यांसह न्यू-यार्क येथून उड्डाण घेतली होती. ज्यानंतर जवळपास 20 तास प्रवास केल्यानंतर हे विमान अखेर सिडनी येथे उतरले आहे. 'कतांस फ्लाईट 7879' असे या विमानाचे नाव असून 16 हजार 200 किमीचा (10 हजार 66 मैल) प्रवास करुन 19 तास 16 मिनीटानंतर हे विमान सुरक्षितरित्या सिडनी येथे रविवारी उतरले.

विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्याकरीता विमानात एक संशोधकांची टीम देखील तैनात करण्यात आली होती. "हे ऐतिहासिक  उड्डाण असून आम्हा सर्वांसाठीच ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा सिडनीत उतरलो तेव्हा आणखी 70 किमीचा प्रवास करण्याइतके इंधन विमानात शिल्लक होते", अशी माहिती वैमानिकाने दिली.

या प्रयत्नानंतर आता कतांस फ्लाईट लंडन, इंग्लंड ते पर्थ, ऑस्ट्रेलिया अशी विमान सेवा सुरु कऱणार असून हा प्रवास 17 तासांहून अधिक असणार आहे. 

Web Title: The plane was flying for almost 20 hours, traveling over 10,000 miles and landing in Sydney

संबंधित बातम्या

Saam TV Live