गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लास्टिकबंदी होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 मार्च 2018

राज्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लास्टिकबंदी होणार आहे. ही बंदी सरसरकट नसून टप्प्याटप्यानं बंदी घालण्यात येणार आहे, सुरुवातीला सरकार सरसकट बंदीच्या विचारात होतं. पण नंतर सरकारनं टप्प्याटप्प्यानं प्लास्टिक वापरातल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.

सुरुवातीला प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, टोप्या, ग्लास, स्ट्रॉ आणि प्लास्टिक प्लेटवर बंदी घालण्यात येणार आहे. सहा महिन्यानंतर पाण्याच्या प्लास्टिक बाटल्य़ांवरही बंदी घालण्यात येणार आहे.

या बंदीतून रोपवाटीकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पिशव्या, कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्य़ा पिशव्या आणि दुधाच्या पिशव्या वगळण्यात आल्यात. पण दूध वितरण कंपनीला वापरलेल्या दुधाच्या पिशव्या संकलीत करण्याची व्यवस्था निर्माण करण्यास सांगण्यात आलंय. 

सरकारनं घोषणा केली पण अंमलबजावणीसाठी त्याची पुरेशी जनजागृती झालेली नाही. लोकांना प्लास्टिकचा सक्षम पर्यायही देण्यात आलेला नाही. प्लास्टिकचे पर्याय दिले नसले तरी सर्वसामान्य लोकांनी प्लास्टिकबंदीचं स्वागत केलंय. याअगोदरच राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. पण ही बंदी कागदावरच आहे. सरकारनं केलेली ही प्लास्टिकबंदीही आदेशापुरतीच न राहो हीच माफक अपेक्षा. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live