प्लॅस्टिक बंदीचा निर्णय सरकारचा की एका खात्याचा- राज

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - प्लॅस्टिकबंदीचा निर्णय एका खात्याचा आहे की, सरकारचा अस प्रश्न आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ते प्लॅस्टिक बंदीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. प्लॅस्टिकबंदीनंतर मुख्यमंत्र्यानी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य केलेले नाही. याचा अर्थ काय हे स्पष्ट करायला हवे. काही प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे, काही प्लॅस्टिकवर नाही लोकांनी नेमके काय समजायचे हे कळत नाही.

पर्यावरण खात्याचे मंत्री असणाऱ्या रामदास कदम यांच्यावरही राज यांनी टीका केली आहे. रामदास कदम हे महाराष्ट्रातल्या नद्या प्रदुषित आहेत त्याच्याविषयी बोलताना दिसत नाहीत, नद्यांमध्ये औद्योगिकरणाचे पाणी सोडले जाते. महानगरपालिका स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्लॅस्टिकबंदीसारखे निर्णय लोकांवर लादत आहे. महानगरपालिकेने किती कचराकुंड्या उभ्या केल्या आहेत, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने काय प्रयत्न केले आहेत. परदेशातील सुविधा महानगरपालिकांनी पहायला हव्यात. परदेशातील कचऱ्याचे केलेले व्यवस्थापन पाहून त्यातून शिकण्याची गरज सरकारला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
कचऱ्याचे काय करायचे हा निर्णय सरकारने घ्यायला हवा. डंपिग ग्राऊंडचा प्रश्न गहन आहे. त्याचबरोबर, त्यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये कशी कामे केली हे सांगितले सर्व मंत्र्यांनी नाशिकमध्ये चाललेले काम पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. एकूणच, राज यांनी प्लॅस्टिक बंदीसंदर्भात सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live