प्लास्टिकबंदी तर झाली... प्लास्टिकचा वापर थांबला आहे का?   

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

राज्यात प्लास्टिंकबंदी लागू करण्यात आली असली, तरी खरोखरंच प्लास्टिकचा वापर थांबला आहे का? हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये, म्हणून लोणावळ्यात थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. लोणावळ्यातील व्ही के वॉर्रन या दुकानाला लोणावळा नगरपरिषदेनं तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. प्लास्टिक कॅरीबॅग वापरली म्हणून हा दंड ठोठावण्यात आलाय. राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर भाजी बाजारात प्लास्टिकबंदी संबंधी ठिकठिकाणी फलक लागलेले दिसत आहेत.  मात्र या पार्श्वभूमीवर भाजीविक्रेते आणि ग्राहक यांच्या प्लास्टिकवापरामध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत नाही.

राज्यात प्लास्टिंकबंदी लागू करण्यात आली असली, तरी खरोखरंच प्लास्टिकचा वापर थांबला आहे का? हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये, म्हणून लोणावळ्यात थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. लोणावळ्यातील व्ही के वॉर्रन या दुकानाला लोणावळा नगरपरिषदेनं तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. प्लास्टिक कॅरीबॅग वापरली म्हणून हा दंड ठोठावण्यात आलाय. राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर भाजी बाजारात प्लास्टिकबंदी संबंधी ठिकठिकाणी फलक लागलेले दिसत आहेत.  मात्र या पार्श्वभूमीवर भाजीविक्रेते आणि ग्राहक यांच्या प्लास्टिकवापरामध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत नाही. ग्राहकांना अजूनही कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे प्लास्टिकची पिशवी द्या, अशी मागणी केली जाते. दरम्यान, मुंबईतील काही मंडयांमध्ये प्लास्टिकऐवजी वर्तमानपत्रात भाज्या बांधून द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मात्र लोणावळ्यात करण्यात आलेल्या कारवाईमुळे विक्रेते प्लास्टिकचा वापर थांबवतात का, हे पाहणं महत्वाचंय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live