PM किसान योजनेतले पैसे थेट ऑपरेटरच्या खात्यात?प्रशासन म्हणतं, ऑपरेटरकडून चुकून घडलं !

साम टीव्ही
रविवार, 21 जून 2020
  •  
  • PM किसान योजनेतले पैसे थेट ऑपरेटरच्या खात्यात ?
  • प्रशासन म्हणतं, ऑपरेटरकडून चुकून घडलं !
  • हा घोटाळा म्हणायचा की मानवी चूक ?

पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान योजनेत अनियमितता असल्याचं समोर आलंय. पीएम किसान योजनेतले पैसे थेट ऑपरेटरच्या खात्यात जमा होत असल्याच्या तक्रीर समोर येतायंत. नेमकं काय आहे हे प्रकरण. पाहुयात एक रिपोर्ट

नरेंद्र मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पीएम किसान योजनेत अनियमतता होत असल्याचं समोर आलंय. या योजनेअंतर्गत कुणाचेही पैसे कुणाच्याही खात्यावर जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय. इगतपुरी तालुक्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यात. दरम्यान ऑपरेटरकडून हा प्रकार चुकून झाला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

पीएम किसान योजना आजवर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आलीय. पण या योजनेत एका शेतकऱ्याचे पैसे दुसऱ्याच खात्यावर जमा होत असल्याचं समोर आलंय. आता हा गैरव्यवहार म्हणायचा की तांत्रिक चूक हा प्रश्न निर्माण झालाय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live