3 मेंपर्यंत देशाचं लॉकडाऊन कायम, मात्र 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये सूट मिळू शकते-मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मोदींनी काही घोषणा केल्यात. दरम्यान, देशाचा लॉकडाऊन ३ मेंपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.यात २० एप्रिलपासून काही भागात कदाचित संचारबंदी शिथील होऊ शकते. 

पंतप्रधान मोदींनी कोरोनावरून आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची घोषणादेखील केली. त्यामुळे नागरिकांना आता ३ मेपर्यंत घरातच राहावं लागणार आहे. याशिवाय २० एप्रिलपर्यंत प्रत्येक राज्यातील स्थितीचे मुल्यांकन करणार येणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.. आणि ज्या भागात २० एप्रिलपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईल, तिथे काही गोष्टींना सशर्त परवानगी देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.उद्या सरकारकडून उद्या नवीन विस्तृत अशी नियमावली जारी करण्यात येणार आहे. तसंच गरिबांना मदत करा, कोणालाही नोकरीवरून काढू नका असं आवाहनही मोदींनी केलंय.

पाहा मोदींचं संपूर्ण भाषण-

कोरोना विरुद्धची ही लढाई पुढे कशी न्यायची, विजयी कसे व्हायचे, लोकांच्या समस्या कमी कशा करता येतील, जीव कसे वाचवता येतील याबाबत राज्यांबरोबर सतत चर्चा सुरु आहे. प्रत्येकाची हीच सूचना आहे की लाॅकडाऊन वाढवायला हवा आहे. काही राज्यांनी निर्णय घेतला आहे. साऱ्या सूचना लक्षात घेऊन ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवायला लागेल, असा निर्णय घ्यावा लागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. मात्र, कोरोना रोखणाऱ्या भागांना २० एप्रीलनंतर काही लाॅकडाऊन मधून काही सूट देता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले 

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लाॅकडाऊनचा २१ दिवसांचा कालावधी आज संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. २० एप्रीलपर्यंत कडक भूमीका घेत हाॅटस्पाॅट टवाढू द्यायचे नाहीत हा निर्णय झाला आहे. एकही रुग्ण वाढू द्यायचा नाही. २० एप्रीलपर्यंत जिथे हे साध्य होईल तिथे लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल करता येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. 

लोकांना कष्ट सहन करुन देशाला वाचवताहेत. लोकांना प्रचंड त्रास होतोय कुणाला खाण्याची समस्या कुणाला येण्या जाण्याची. मी सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. We The People Of India हे राज्यघटनेत म्हटले आहे. हीच ती शक्ती आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सामुहिक शक्तीचा संकल्प ही त्यांना खरी आदरांजली आहे. बाबासाहेबांचे जीवन आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येतून पार पाडण्याची निरंतर प्रेरणा देते. मी देशवासियांच्या वतीने बाबासाहेबांना प्रणाम करतो.

देशाच्या अनेक भागात वेगवेगळे सण उत्सव साजरे होत आहेत. बैसाखी, उथांडू अनेक राज्यांत नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. लाॅकडाऊनच्या बंधनांमध्ये देशाचे लोक ज्या प्रकारे नियमाचे पालन करत आहेत, संयमाने आपल्या घरात राहून सण साधेपणाने साजरे करत आहे. या साऱ्या गोष्टी प्रेरणादायी आहेत. मी नव्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. 

साऱ्या जगात कोरोनाची वैश्विक समस्या आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने आपल्याकडे संक्रमण रोखण्याचे प्रयत्न केले आपण याचे साक्षी आणि सहभागी आहात. जेव्हा आपल्याकडे कोरोनाची एकही केस नव्हती तेव्हा भारताने एअरपोर्टवर स्क्रिनिंग सुरु केली होती. जेव्हा आमच्याकडे केवळ ५५० केसेस होत्या तेव्हा भारताने २१ दिवसांच्या लाॅकडाऊनचे मोठे पाऊल उचलले. भारताने समस्या वाढण्याची वाट नाही पाहिली. जलद निर्णय घेऊन त्या ठिकाणीच समस्या रोखण्याचा प्रयत्न केला. 

हे असे संकट आहे ज्यात कोणत्याही देशाशी तुलना करणे योग्य नाही. तरीही काही सत्य नाकारू शकत नाही. जर जगातल्या मोठ्या सामर्थ्यवान देशांतले आकडे पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारत खूप चांगल्या परिस्थितीत आहे. महिना दीड महिन्यापूर्वी अनेक देश भारताबरोबर होते. आज त्या देशांमध्ये भारताच्या तुलनेत कोरोना केस २५ ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्या देशांत हजारो लोकांचे दुःखद मृत्यू झाले आहेत. भारताने holistic integrated Approch घेतला नसता तर आज भारताची स्थिती काय असती याची कल्पना करुनच काटा येतो. पण गेल्या काही दिवसांच्या अनुभवातून हे स्पष्ट आहे की आम्ही जो मार्ग स्वीकारला तोच योग्य आहे. सोशल डिस्टन्सिंग व लाॅकडाऊनचा मोठा फायदा देशाला मिळाला आहे. 

आर्थिक दृष्टीने पाहिले तर खूप किंमत चुकवावी लागली आहे. पण लोकांच्या जीवापुढे याची तुलना होऊ शकत नाही. मर्यादित साधनांच्या सहाय्याने भारत ज्या मार्गाने चालला आहे त्याची चर्चा जगभर होणे स्वाभाविक आहे. राज्य सरकारे स्थानिक स्वराज्य संस्थांनी यात खूप जबाबदारीने काम केले आहे. पण मित्रांनो या प्रयत्नांतूनही कोरोना ज्या पद्धतीने पसरतो आहे त्यातून जगभरातल्या आरोग्य तज्ज्ञांना व सरकारला सतर्क केले आहे. 

WEB TITLE - marathi news PM MODI ADDRESSING INDIA. LOCKDOWN EXTENDED TILL 3 MAY.


संबंधित बातम्या

Saam TV Live