मोदींचं जनतेला आवाहन, रविवारी हा उपक्रम करा पण सोशल डिस्टंसिंगचं पालन करुन

साम टीव्ही
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

रविवारी रात्री 9 वाजता भारताचा आसमंत दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताच्या महाशक्तीचं दर्शन घडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलंय. तुमच्या गॅलरीत या, पडवीत या आणि दिवे वा टॉर्च जळवा असं आवाहन मोदींनी केलंय. आज त्यांनी देशाला संबोधन केलं

रविवारी रात्री 9 वाजता भारताचा आसमंत दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताच्या महाशक्तीचं दर्शन घडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलंय. तुमच्या गॅलरीत या, पडवीत या आणि दिवे वा टॉर्च जळवा असं आवाहन मोदींनी केलंय. आज त्यांनी देशाला संबोधन केलं, त्यावेळी त्यांनी एकजुटीचा संदेश दिला. कोरोनामुळं तयार झालेला अंधार प्रकाशानं हटवायचा असल्याचं मोदींनी सांगितलंय.
मात्र, हा उपक्रम करत असताना कुणीही एकत्र येऊ नये. सामुहिक दिवे लावण्याचा कार्यक्रम करु नये अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्यात. सोशल डिस्टंसिंग राखूनच हा उपक्रम करु असं त्यांनी म्हटलंय.
22 मार्चला सामुहिक थाळी वादनाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या होत्या. सामुहिक कार्यक्रम झाले होते. यावर पंतप्रधानानी नाराजी व्यक्त केली होती.

पाहा सविस्तर या व्हिडीओमध्ये मोदी नेमकं काय म्हणाले...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live