PM Narendra Modi चित्रपटाच्या अडचणीत पुन्हा भर; चित्रपटाला पुन्हा स्थगिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 एप्रिल 2019

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकांच्या पाश्वभूमिवर येणार असल्याने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती दिली आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. तसेच 'यू' सर्टिफिकेट चित्रपटाला मिळाले होते. उद्या 11 एप्रिल (गुरुवार) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु, आता चित्रपटाला पुन्हा स्थगिती मिळाली आहे. 

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते. तसेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते.

यानंतर, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय याने याबाबत ट्विट देखील केले होते. ट्विटमध्ये त्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकलो असल्याचे म्हटले होते.. तुम्हा सर्वांचे आभार. लोकशाहीवरील विश्वास दृढ केल्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार असेही तो ट्विटमध्ये म्हणाला होता. 

Web Title: marathi news pm modi biopic SC put stay on the release of the film 

संबंधित बातम्या

Saam TV Live