काँग्रेसला फक्त मलई कशी मिळेल, याचीच चिंता असते - नरेंद्र मोदी

काँग्रेसला फक्त मलई कशी मिळेल, याचीच चिंता असते - नरेंद्र मोदी

आलो : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसला फक्त मलई कशी मिळेल, याचीच चिंता असते. मात्र, आम्हाला देशाच्या भल्याची चिंता असते. तसेच काँग्रेसचे नेते गरिबांची थाळी चोरतात. तर त्यांचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरतात, असेही ते म्हणाले. 

अरुणाचल प्रदेशातील आलो येथील एका जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपसाठी अरुणाचल प्रदेश सौभाग्य आणणारा आहे. उत्तर पूर्वमध्ये कमळ फुलण्याची सुरवात इथूनच झाली होती. काँग्रेसची नेहमीच भ्रष्टाचाराबरोबर आघाडी राहिली आहे. त्यांचे नेते गरिबांची थाळी चोरतात. तर काँग्रेसचे दिल्लीत बसलेले नेते आयकर चोरी करतात.

तसेच ते पुढे म्हणाले, काही लोकं स्वत: जामिनावर आहेत. जे जामिनावर आहेत, ते 'चौकीदार'ला शिव्या देत आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: PM Modi Criticizes Congress Leaders on Various Issue

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com