विराटचं चॅलेन्ज मोडीत ; PM फिट तो इंडिया फिट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

राज्यवर्धन राठोडनं सुरु केलेलं फिटनेस चॅलेन्ज सिरीयसली घेतलं गेलं. सुरुवातीला सेलिब्रिटींनी फिटनेस चॅलेन्जमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी फिटनेस चॅलेन्जमध्ये मागे कसे राहतील? कोवळ्या सूर्यकिरणांच्या साक्षींनं, पंतप्रधान निवासातल्या रम्य वातावरणात पंतप्रधानांनी योगप्रकार केले आणि विराटचं चॅलेन्ज मोडीत काढलं. 

आता मोदींनी फक्त योगा केला असता, तर गोष्ट वेगळी होती... पण आपल्या फिटनेस चॅलेन्जचा योग साधून मोदींनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी चॅलेन्ज केलंय.

मोदींनी आपला व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर  तुफान टिवटिवाटही झाला. हजारोंच्या संख्येनं मोदींचा योगा ट्रेंड होतोय. आता खरी प्रतीक्षा आहे ती कुमारस्वामी मोदींचं चॅलेन्ज स्वीकारतात का याची?

संबंधित बातम्या

Saam TV Live