राफेल कराराच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं : संजय राऊत

राफेल कराराच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं : संजय राऊत

मुंबई : राफेल करारावरून आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे चित्र दिेसत आहे. शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवर उत्तर द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. राफेल करारात झालेल्या गैरव्यवहाराला पूर्णपणे नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे मंत्रिमंडळातील इतर कोणीही या मुद्यावर उत्तर न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राऊत म्हणाले की, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलाँद हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत, त्यांच्या गळाभेटीचे अनेक फोटो आम्ही पाहिले आहेत. मोदींच्या विनंतीवरुन ओलाँद भारतातही आले होते. मात्र, आता खुद्द ओलाँद यांनीच राफेल कराराबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याला उत्तर देण्याची सर्वस्वी जबाबदारी मोदींची असून याला अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन किंवा अर्थ सचिवांनी उत्तर देऊ नये स्वतः मोदींनीच यावर उत्तर द्यायला हवे.

दरम्यान, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राफेल करारावर मोदी अजूनही गप्प आहेत हे थक्क करणारे आहे. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी परदेशी अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना चोर म्हटले आहे, हे खूपच निंदनीय असल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला होता.

Web Title : marathi news PM Modi should should answer all the questions about rafale deal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com