पंतप्रधान मोदी अबूधाबीतील भारतीयांना संबोधणार 

पंतप्रधान मोदी अबूधाबीतील भारतीयांना संबोधणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारी 9 ते 12 या दरम्यान हा दौरा असून मस्कत, ओमान या ठीकाणी ऐतिहासिक सोहळा रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओमानमधील सगळ्यात भव्य स्टेडियम मस्कतच्या सुलतान कुबूस स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये अनिवासी भारतीयांच्या सभेत मोदी भाषण करणार आहेत. 

अबू धाबीमध्ये पहिले मंदीर उभारण्यात येणार आहे. पश्चिम आशियातील हा दौरा मोदींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आखाती देशांतील दुबईमध्येच हिंदूंचे एकमेव मंदीर आहे. 2015 मध्ये मोदींनी अमिरातीला भेट दिली होती. त्यावेळी संयुक्त अरब अमिराती सरकारने मंदीरासाठी जागा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 20 हजार चौरस मीटरची जागा अल वथबा येथे देण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 26 लाख भारतीय असून तिथल्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के भारतीय आहेत. भारत व संयुक्त अरब अमिराती यांच्यात आर्थिक व सुरक्षाविषयक सहकार्याला मोदींच्या या भेटीमुळे आणखी चालना मिळेल, अशी चर्चा आहे.  

दुबईमध्ये सहावे जागतिक सरकार संम्मेलन आहे. 10 फेब्रुवारीला मोदी अबुधाबीमध्ये येणार आहेत. त्यांनंतर ते दुसऱ्या दिवशी दुबईला भेट देतील.   

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com