यंदा पंतप्रधान मोदी लढवणार ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा निवडणूक? 

यंदा पंतप्रधान मोदी लढवणार ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा निवडणूक? 

नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी आणि गुजरातमधील अहमदाबाद या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हा निर्णय भारतीय जनता पक्षासाठी फायद्याचा ठरला होता. या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, मोदी एका नवीन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मोदी पूर्व भारतात भाजपाची पाळेमुळे भक्कम करण्यासाठी ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. मोदींनी जगन्नाथ (पुरी) येथून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ओडिशातील भाजपाच्या समितीने दिला आहे.

2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने पूर्व भारतावर लक्ष केंद्रित आहे. मोदी यांनी पुरी येथून निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढेल, असा दावा भाजपाचे ओडिशा प्रदेशाअध्यक्ष वसंत पांडा यांनी केला आहे. ओडिशामध्ये सध्या दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या बीजेडीविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ओडिशातील 21 पैकी केवळ एक जागा जिंकली होती. आता या राज्यांमधून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी ओडिशातील भाजपाच्या कार्यकारिणीने दिलेला प्रस्ताव स्वीकारल्यास ते ओडिशामधून निवडणूक लढवणारे नरसिंहाराव यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान ठरतील. याआधी 1996 साली नरसिंहा राव यांनी ओदिशामधील बरहामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

WebTitle : marathi news pm narendra modi to contest elections from jagannath puri of odisha 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com