काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात : पंतप्रधान

काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात : पंतप्रधान

मुंबई : आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा करण्यात आली होती. त्यावेळी देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हे सगळे संविधानानुसार करण्यात आले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


मुंबईत आणीबाणीच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे : 

- आणीबाणीच्या या काळ्या दिवसाचे आम्ही स्मरण करतो. 

- काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात.

- आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केली.

- काळा डाग लागला याच्या माध्यमातून हे पाप करणारा काँग्रेस पक्ष आणि त्यावेळचे सरकार आलोचन करणारे ठरले.

- आता आम्ही हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करत नाही.

- स्वातंत्र्याचे आपण कितीही नाव काढू. मात्र, ते समजू शकत नाही. 

- आजच्या पिढीतील तरुणांना आणीबाणीबाबत विचारले तर त्यांना जास्त माहित नाही.

- त्यांना अंतर्गत बाबी माहित नाहीत.

- तहानलेला कळते की पाणी नसल्यावर काय करायचे, अशी परिस्थिती होती.

- लोकशाही, संविधानाप्रति आस्था असायला हवी.

- तेव्हा देशात भीतीचे वातावरण होते. मात्र, हे सगळे संविधानानुसार करण्यात आले होते.

- संविधानाचा दुरुपयोग करण्यात आला होता. हे उदाहरण क्वचितच पाहिला मिळते.

- आपली सत्ता जाण्याची भीती वाटली. तेव्हा त्यांना देश संकटात असल्याचे सांगितले. 

- देश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याला फक्त आम्हीच वाचवू शकतो, असे काँग्रेसकडून अनेकदा सांगण्यात आले होते. 

- काळा दिवस काँग्रेस विरोधासाठी नाही.

- गांधी घराण्याची खुर्ची जाणार म्हटले की देश धोक्यात येतो.

- स्वार्थासाठी काँग्रेसने पक्षाचेही तुकडे केले.

- स्वार्थासाठी काँग्रेसने न्यायव्यवस्थेलाही वेठीस धरले.

- आणीबाणीनंतर काही बाबींवर बंदी आणण्यात आली.

- दलित संकटात आहे, अशी भीती निर्माण केली जात होती.

- संविधानाला तुडवले ते आज जगात भीती निर्माण करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com