पुलवामामधील भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कराला संपूर्ण स्वतंत; आपल्या सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही - पंतप्रधान मोदी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा निषेध केला. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते बोलताना म्हणाले. या हल्याच्या मागे जे आहेत त्यांन शिक्षा मिळणारच असेही मोदींनी सांगितले. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा निषेध केला. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते बोलताना म्हणाले. या हल्याच्या मागे जे आहेत त्यांन शिक्षा मिळणारच असेही मोदींनी सांगितले. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान बोलत होते. 

देशासाठी ही वेळ संवेदनशिल आहे. या हल्यानंतर देशाची मनस्थिती आणि देशातील वातावरण दु:ख आणि आक्रोशाने भरलेले आहे. या परिस्थितीचा आपण सर्वांनी मिळून सामना करायला हवा. या परिस्थितिचे राजकारण होता कामा नये असेही मोदींनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

पाकिस्तान ज्या पद्धतीने कारवाया करत आहे. त्यांना वाटत आहे ते आपल्या देशात अस्थिरता निर्माण करण्यात सफल होतील. परंतु, असे होणार नाही. आपल्या शेजारील देश स्वत: आर्थिक तणावातून जात असताना भारताविरुद्ध अशा कारवाया करुन त्यांना वाटत आहे आपण या देशाला कमजोर करु. परंतु, असे होणार नाही. याचे त्यांना परिणाम त्यांना भागावे लागतिल असेही मोदींनी स्पष्ट केले.

या हल्याचा जगभरातून निषेध होत आहे. त्यामुळे जगातिल सर्व मानवतावादी शक्तिंनी एक होऊन या आतंकवादाशी दोन हात केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातिल. या हल्यात हुतात्मा झालेला प्रत्येक जवानाच्या आत्माला नमन करुन मोदींनी हुतात्मांची आहुती वाया जाणार नाही असे सांगितले.

या परिस्थितीला प्रत्युतर देण्यासाठी समृद्धीच्या आणि विकासाच्या रत्स्याला आम्ही आणखी मजबूत करु असे मोदींनी यावेळी बोलताना नमुद केले. 

Web Title: 'The country is not going to stop now' - Narendra Modi

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live