केलेल्या कार्याबद्दल सुषमाजी सदैव स्मरणात राहतील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पुणे : देशासाठी केलेल्या कार्याबद्दल सुषमाजी सदैव स्मरणात राहतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांचे आज रात्री उशीरा नवी दिल्लीत निधन झाले. 

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी परराष्ट्रमंत्री व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना आदरांजली अर्पण केली

''सुषमा स्वराज्य एक चांगल्या नेत्या होत्या. पक्ष सांभाळता सांभाळता त्यांनी सर्वांना समवेत घेऊन काम केले. मला आजही आठवतय. पंधराव्या लोकसभेच्या समारोपाला मी भाषण केले. त्यावेळी सुषमा स्वराज्य या कोकीळेसारख्या बोलतात असा त्यांचा उल्लेख केला होता.

एक अभ्यासू विशेषत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा मोठा अभ्यास असणार्या नेत्या आज आपल्यातून निघून गेल्या आहेत. त्या भाजपच्या नेत्या असल्या तरी सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचा चांगला संबंध होता. त्यांच्या निधनाने देश एका अभ्यासू नेत्याला मुकला आहे." असे माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live