नरेंद्र मोदींनी सर्वांसमोर टोचले नापाक पाकचे कान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

भारत-पाक बिघडलेल्या संबंधांचे पडसाद  बिश्केकमधल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेत पाहायला मिळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं. इतकच नाही तर त्यांच्याशी संवाद करणंही टाळलं.

भारत-पाक बिघडलेल्या संबंधांचे पडसाद  बिश्केकमधल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन परिषदेत पाहायला मिळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं. इतकच नाही तर त्यांच्याशी संवाद करणंही टाळलं.

किरगिझस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी एससीओ नेत्यांसाठी आयोजित केलेल्या अनौपचारिक डिनरआधी नरेंद्र मोदी किंवा इम्रान खान यांनी कोणतीही बैठक घेतली नाही. याउलट पुलवामा हल्लानंतर आक्रमक झालेल्या मोदींनी या परिषदेत पाकिस्तानचे चांगलेच कान टोचले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांची आर्थिक नाकेबंदी करा असं सांगत मोदींनी इम्रान खान यांच्या उपस्थितीत पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. 

पहिल्या दिवशी असलेला हा दुरावा दुसऱ्या दिवशीही दिसून आला. SCO परिषदेच्या फोटो सेशन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात बरचसं अंतर दिसून आलं. या दुराव्यातून आता कोणतीही चर्चा नाही हेच स्पष्ट झालं. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह इतर देशांच्या प्रमुखांची अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. तर इम्रान खान मात्र एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

आर्थिक दुरवस्थेमुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झालीय. त्यातच भारताविरोधात कुचाळक्या सुरूच ठेवल्या तर किती महागात पडू शकतं हेही आता पाकिस्तानला चांगलच उमगलं असेल. 

WebTitle : marathi news PM narendra modi at SCO summit on pakistan

 


संबंधित बातम्या

Saam TV Live