झाकीर नाईकच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उचलले पाऊल

झाकीर नाईकच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उचलले पाऊल

व्लादिवोस्तोक (रशिया) : वादग्रस्त भारतीय मुस्लिम धर्मउपदेशक झाकीर नाईक याला जेरबंद करण्याची तयारी भारत सरकारने सुरू केली आहे. झाकीर नाईकने सध्या मलेशियात आश्रय घेतला आहे. पण, त्याला भारतात परत आणण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात मिलेशियाच्या पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. 

झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचे काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. आज, तेथे होत असलेल्या ईस्ट इकॉनॉमिक फोरम परिषदेला त्यांनी हजेरी लावली होती. या परिषदेला रशिया आणि भारतासह जपान, मालदीव आणि मलेशियाचे पंतप्रधान उपस्थित आहेत. इकॉनॉमिक फोरमला हजेरी लावण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान महातीर महोम्मद यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा केली. त्यावेळी जम्मू-काश्मीर संदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती आणि त्या निर्णयामागील कारणे याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी महातीर यांना दिली. तसेच या चर्चेत मोदी यांनी वादग्रस्त मुस्लिम धर्मउपदेशक झाकीर नाईकचा मुद्दा उपस्थित केला. झाकीर नाईकचे प्रत्यापर्ण करण्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या संदर्भात परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर इथूनपुढे या विषया संदर्भात दोन्ही देशांचे अधिकारी संपर्कात राहतील, यावर नेत्यांचे एकमत झाले. 

कोण आहे झाकीर नाईक
झाकीर नाईक हा मुस्लिम मुलतत्ववादी धर्मउपदेशक आहे. टीव्हीच्या माध्यमातून उपदेश देताना धार्मिक भावना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबईत जन्मलेल्या झाकीरने इस्लामिक रसर्च फाऊंडेशनची स्थापना केली होती. झाकीर नाईक पीस टीव्हीच्या माध्यमातून इंग्रजी, ऊर्दू आणि अरबी भाषेत व्याख्याने देतो. भारतात कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळेच त्याने मुस्लिमबहूल मलेशियाला पलायन केले आहे. गेल्या महिन्यात ८ ऑगस्ट रोजी त्याने मलेशियामध्ये हिंदू आणि चीनी नागरिकांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

WebTitle : marathi news PM narendra modi spoke to PM of Malaysia to capture zakir naik  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com