पीएमसी बँक खातेधारक महिलेची आत्महत्या, 4 दिवसात तिसरा मृत्यू

मोहिनी सोनार
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

मुंबई : पीएमसी बँके प्रकरणात आता तिसरा मृत्यू झाल्याचं समोर येतं आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे काढण्यासाठी खातेधारक खूप चिंतेत आहेत. त्यामुळे त्याच नैराश्यातून एके महिलेनेदेखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमसी खातेधारक निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेनं मंगळवारी आत्महत्या केली. अंधेरीतल्या राहत्या घरी झोपेच्या गोळा घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. याआधी पीएमसी खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी फतोमल पंजाबी यांचाही मृत्यू झाला होता. गुलाटी यांची तब्बल 90 लाखांची रक्कम पीएमसी बँकेत होती..

मुंबई : पीएमसी बँके प्रकरणात आता तिसरा मृत्यू झाल्याचं समोर येतं आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे काढण्यासाठी खातेधारक खूप चिंतेत आहेत. त्यामुळे त्याच नैराश्यातून एके महिलेनेदेखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमसी खातेधारक निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेनं मंगळवारी आत्महत्या केली. अंधेरीतल्या राहत्या घरी झोपेच्या गोळा घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. याआधी पीएमसी खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी फतोमल पंजाबी यांचाही मृत्यू झाला होता. गुलाटी यांची तब्बल 90 लाखांची रक्कम पीएमसी बँकेत होती.. पीएमसी बँकेविरोधात मुंबईत किला कोर्टासमोर आयोजित केलेल्या रॅलीतही ते सहभागी झाले होते....मात्र, रॅलीनंतर ते घरी गेले आणि घरी हृदयक्रिया बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनांमुळे खातेधाराकांमध्ये आखणीनच घबराहट निर्माण झाली आहे. मात्र पुढे या खातेधारकांच्या पैशांचं काय होणार हा मोठा प्रश्न समोर आहे. त्यामुळे हे सर्व खातेधारक आपले पैसे मिळवण्यासाठी हवे ते प्रयत्न करताना दिसताय. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येईल की नाही हे येणारा काळच सांगेल.

Web Title -  PMC bank account holder woman's death. 


संबंधित बातम्या

Saam TV Live