पंजाब अँड महाराष्ट्र बँकेवर निर्बंध; बँकेचे ठेवीदार हवालदिल

मुंबईहून तुषार रूपनवरसह अमोल कविटकर, साम टीव्ही पुणे
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

आता पुढचे सहा महिने PMC बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता पुढचे सहा महिने खात्यातून केवळ एक हजार रुपये काढता येतील. कारण या बँकेवर आता रिझर्व्ह बँकेनं अनियमिततेचा ठपका ठेवून सहा महिन्यांसाठी निर्बंध लादलेत.

या निर्बंधांमुळे बँकेला नवी कर्ज देणं, जुन्या कर्जाचं नूतनीकरणं करणं, बँकेला गुंतवणूक करणं, ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आलीय. बँकेवरच्या या निर्बंधांमुळे सामान्य ठेवीदार मात्र आपल्या ठेवींचं काय होणार, या कल्पनेनं चांगलाच हवालदिल झालाय. 

  • पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा 7 राज्यांमध्ये तब्बल 137 शाखा आहेत.
  • आघाडीच्या 10 को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये तिची गणना होते.
  • 2019 या वर्षात बँकेनं 99.69 कोटींचा निव्वल नफा कमावला होता. त्या आधीच्या वर्षात हाच आकडा 100.90 कोटी इतका होता.
  • बँकेचा 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एनपीए 2.19 टक्के इतका तर त्या आधीच्या वर्षात हाच एनपीए 1.05 टक्के इतका होता.
  • बँकेकडे 11 हजार 617 कोटींच्या ठेवी असून, 8 हजार 383 कोटींची कर्ज बँकेनं दिलीत.
  • बँकेच्या ठेवीदारांनीच आता त्यांच्या हक्कांच्या पैशांसाठी लढा उभारण्याची गरज आहे, असा सल्ला दिला जातोय.

ठेवीदारांनी मोठ्या विश्वासानं पीएमसी बँकेत ठेवलेल्या ठेवींचं भवितव्य आता अधांतरी झालं. त्यामुळे पीएमसी बँकेच्या भवितव्याकडे ठेवीदारांसह सर्वांचंच लक्ष लागलंय.

Webtitle : marathi news PMC bank and RBI news in detail

संबंधित बातम्या

Saam TV Live