PMC बँकेचा आणखी एक बळी 

किरण राठोड
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

देशात कुठे आणि कसा मृत्यू आपल्याला कवटाळेल याचा काही नेम नाही. कधी
अपघातात जीव गमवावा लागतो तर कधी नैसर्गिक घटनांमध्येही निरापराध लोकांचा 
बळी जातो. आता तर चक्क घोटाळेबाजांमुळे प्राण गमावण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलीय.

देशात कुठे आणि कसा मृत्यू आपल्याला कवटाळेल याचा काही नेम नाही. कधी
अपघातात जीव गमवावा लागतो तर कधी नैसर्गिक घटनांमध्येही निरापराध लोकांचा 
बळी जातो. आता तर चक्क घोटाळेबाजांमुळे प्राण गमावण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलीय.

'पंजाब ऍन्ड महाराष्ट्र कॉपरेटीव्ह बँक' अर्थात PMCमध्ये पैसे अडकल्यानं 
पैशाच्या विवंचनेत अनेकांचे बळी गेलेत. अशीच काहीशी स्थिती 73 वर्षीय भारती सदारंगानी यांची झाली.
PMCमध्ये पैसे अडकल्याने हवालदिल झालेल्या भारती यांच्यापुढे, पैशाअभावी दैनंदिन गरजा कशा भागवायचा
हा प्रश्न निर्माण झाला. आणि याच तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
PMC बँकेचा घोटाळा उघड झाल्यापासून खातेधारकाचा हा पाचवा बळी ठरलाय. 

खातेदारांच्या मृत्यूमुळे इतर PMC खातेधारकांमधला रोष वाढू लागलाय. बँकेबाबत 
लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी RBI आणि केंद्र सरकारकडे केली जातेय. दरम्यान, 
मुंबई पोलिसांनी घोटाळ्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. पण घोटाळेबाजांऐवजी
सामान्यांनाच याची किंमत मोजावी लागत असल्याने, 'बँक मालक तुपाशी, अन् ग्राहक उपाशी'
अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय..

मृत PMC खातेधारकांची नावं 
मुरलीधर धारा, मुलुंड
संजय गुलाटी, अंधेरी
फतमल पंजाबी, मुलुंड 
डॉ.निवेदिता बिजलानी, वर्सोवा  
भारती सदारंगानी, सोलापूर

Web Title : PMC Bank Customer Passed Away


संबंधित बातम्या

Saam TV Live