पीएमपीला तब्बल 204 कोटींचा तोटा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पीएमपीचा तोटा आता 204 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसंच उत्पन्नाचे अन्य स्त्रोतही 96 कोटी रुपयांवरुन 11 कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत.

परिणामी पीएमपीचे उत्पन्न 62 कोटींनी घटले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी गेल्यावर्षी तुलनेत सुमारे 61 कोटी रुपये वाढवून 210 कोटी रुपयांची मदत केली असली.

तरी पीएमपीची घसरगुंडी कायम आहे. पीएमपी संचालक मंडळाची गुरुवारी बैठक पार पडणार आहे. बैठकीत गेल्यावर्षीचा ताळेबंद मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तोटा पाच कोटींनी कमी झाल्याचे दिसत असले, तरी यंदा उत्पन्नात 62 कोटींची घट झाली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live