PNB  मागचं शुक्लकाष्ठ संपता संपेना; बँकेतील क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

PNB बँकेची स्थिती अस्थिर झालेली असतानाच, आता बँकेतील १० हजार क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला गेल्याचं समोर

पंजाब नॅशनल बँकेच्या मागचे शुक्लकाष्ठ संपण्याचे कोणतेही चिन्ह नाही. PNB बँकेची स्थिती अस्थिर झालेली असतानाच, आता बँकेतील १० हजार क्रेडिट आणि डेबिट कार्डांची माहिती चोरीला गेल्याचं समोर आलंय.  एशियन टाइम्स या हाँगकाँगच्या वृत्तपत्राने याबाबतच वृत्त दिलंय.. कार्डधारकांची वैयक्तिक माहिती सायबर चोरांच्या हातात पडली असून ही माहिती हॅकर्सकडून विकली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएनबीच्या कार्डधारकांची वैयक्तिक माहिती गेल्या तीन महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध होती, असाही गौप्यस्फोट करण्यात आलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live