PNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश

PNB गैरव्यवहार प्रकरण : निरव मोदी बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश

पुणे : हिरा व्यापारी निरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला 7 हजार 300 कोटी रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश आज येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी दिले आहेत. 

मोदी व त्यांच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. बँकेचे कर्मचारी गोकुळ नाथ शेट्टी आणि मनोज हनुमंत खरात यांनी मोदी यांना मदत केल्याचे निकालात नमूद आहे. 

मोदीने केलेल्या फसवणुकी विरोधात पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. सुनावणीत बँकेच्या वकिलांनी आपली बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. मोदी यांच्यावतीने कोणीही न्यायालयासमोर हजर नव्हते. बँकेच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निकाल 6 जुलैला देण्यात येईल, असे न्यायाधीशांनी स्पष्ट  केले होते. 

तीनपैकी दोन दावे निकाली :
बँकेने नीरव मोदी विरोधात तीन दावे दाखल केले असून त्यांपैकी पहिला दावा 7000 कोटी रुपयांचा आहे. दुसरा दावा 300 कोटी रुपयांचा आहे. तर तिसरा दावा 1700 कोटी रुपयांचा आहे. त्यातील दोन दाव्यांचा युक्तिवाद होऊन निकाल झाला. 

WebTitle  : marathi news PNB fraud case court asks nirav modi to return 7 thousand 300 rs with interest

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com