VIDEO | खडसेंची फडणवीसांवर जहरी टीका; भाजपला दिला घरचा आहेर

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

विरोधकांच्या टीकेसह फडणवीसांना आता स्वपक्षीयांच्या टीकेलाही सामोरं जावं लागतंय. एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर जहरी टीका केलीय. पाहूयात याविषयीचं सविस्तर विश्लेषण...

 

विरोधकांच्या टीकेसह फडणवीसांना आता स्वपक्षीयांच्या टीकेलाही सामोरं जावं लागतंय. एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर जहरी टीका केलीय. पाहूयात याविषयीचं सविस्तर विश्लेषण...

 

एकीकडे सत्तास्थापनेच्या नाट्यानंतर फडणवीसांवर हल्लाबोल करण्याच विरोधक कसर सोडत नाहीयेत, तर दुसरीकडे फडणवीस पायउतार झाल्यानंतर आता भाजपतही असंतोषाचा भडका उडालाय. निर्णयप्रक्रियेतून सातत्यानं डावललं गेल्याची तक्रार करणाऱ्या एकनाथ खडसेंनी नाव न घेता फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. इतक्या वर्षांनंतर मनातली खदखद उघडपणे बोलून दाखवताना खडसे भावनिक होताना दिसले. देवेंद्र फडणवीसांचा राजकीय पटलावर उदय झाल्यानंतर हळू हळू खडसे भाजपच्या निर्णयप्रक्रियेतून बाजूला पडताना दिसले. अगदी पाचसहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याच्या थाटात वावरणाऱ्या खडसेंना यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवारीही मिळू शकली नाही. फडणवीसांनी सूत्रबद्धपणे राजकीय पटलावरुन खडसेंचा काटा काढल्याची चर्चा आजही रंगते. त्याचाच उद्रेक आज पाहायला मिळतोय. याकाळात काँग्रेस ऐन भरात होती, राष्ट्रवादीच्या शाखा गावोगावी होत्या अन् भाजपची ओळख केवळ शेटजी आणि भटजींचा पक्ष इतकीच होती, त्याकाळात भाजप तळागाळात पोहचवण्यात खडसेंचा मोलाचा वाटा होता. पण फडणवीसांचा राजकीय उदय जसा झाला, तसतसं खडसेंचं राजकीय पटलावरुन अस्तित्व धूसर होऊ लागलं. किंबहुना ते संपवलं गेलं, अशी कुजबूज सर्रास रंगताना दिसतेच. खडसेंनी अनेकदा खदखद बोलून दाखवली पण भाजपविरोधात कधीही बंडाचं निशाण उभारलं नाही. पण आज सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेतून पायउतार व्हावं लागल्यानंतर मात्र खडसे उद्रेक थांबवू शकले नाहीत, याचीच चर्चा रंगताना दिसतेय.

Web Title -  Poisonous criticism of Khadse on fadanvis


संबंधित बातम्या

Saam TV Live