कुटुंब विस्तारासाठी पोलिस शिपायाने केला सुट्टीचा अर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 जून 2018

​​उत्तर प्रदेशातल्या एका पोलिस शिपायाने सुट्टीसाठी केलेल्या अर्जाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. त्याचं कारणही अतिशय इंटरेस्टिंग आहे. सुट्टी मंजूर करण्यासाठी पोलिस महाशयांनी लिहिलेलं कारण अतिशय रंजक आहे. सोम सिंह या पोलिस शिपायाचा हा सुट्टीचा अर्ज आहे.

उत्तर प्रदेशातल्या महोबा जिल्ह्यात कोतवाली पोलिस ठाण्यात ते तैनात आहेत. 23 जूनपासून सुट्टीवर जाण्यासाठी त्यांनी ठाणेदाराकडे अर्ज केलाय. कुटुंबाच्या विस्तारासाठी असं कारण त्यांनी चक्क सुट्टीच्या अर्जात लिहिलंय. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठाणेदारानंही 30 दिवसांऐवजी 45 दिवसांची सुट्टी मंजूर केलीय. या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झालाय. याची खबर लखनौमधल्या डीजीपींच्या कार्यालयापर्यंतही पोहचली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live